इंग्लंडविरुद्ध 4 सप्टेंबरला पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने 18 चेंडूत 23 धावा केल्या. तो नाबाद होता आणि मैदानावर कायम असूनही ऑस्ट्रेलियाचा दोन धावांनी पराभव झाला. 22 सामन्यात हा 17 वी वेळ होती जेव्हा ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मार्कसने 20 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि संघाचा पराभव झाला. तथापि, त्याच्याविषयी ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य स्पष्ट आहे, त्याला माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीप्रमाणे फिनिशर बनवायचे.
ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्सनी म्हटले आहे की, “संघात पुनरागमन करणारा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसला भारताचा माजी कर्णधार धोनीप्रमाणे फिनिशर म्हणून दीर्घकाळ काम करण्याची संधी दिली जाऊ शकते.”
कमिन्सने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, “आम्ही याबद्दल बोललो आहोत. देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. कोणत्याही क्रिकेट संघातील मधली फळी सर्वात कठीण असते. म्हणूनच आम्ही त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.”
तो म्हणाला, “एमएस धोनीप्रमाणेच जे जगातील सर्वोत्कृष्ट होते. त्यांनी 400 एकदिवसीय सामने खेळले. आम्हाला माहित आहे की चमत्कार रात्रभरात घडू शकत नाही पण आम्हाला खेळाडूंची भूमिका माहित आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.” कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात प्रेक्षकांशिवाय ऑस्ट्रेलियाचा हा पहिला सामना होता आणि कमिन्स म्हणाला की “ते विचित्र दिसत होते. कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही परंतु ते नक्कीच विचित्र होते.”