भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या कसोटी सामन्यात आमने सामने आहेत. उभय संघांतील हा एकमात्र कसोटी सामना गुरुवारी (21 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ मोठी आघाडी मिळवून शकला नाही. स्मृती मंधाना शेफाली वर्मा या सलामीवीर जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज जास्त वेळ तग धरू शकले नाहीत. 77.4 षटकांचा खेळ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 219 धावांवर आपल्या सर्व विकेट्स गमावल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने दिवसाच्या खेळ संपेपर्यंत 19 षटकांमध्ये एका विकेटच्या नुकसानावर 98 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर शेफाली वर्मा 40 धावा करून जेस जोनासेन हिच्या चेंडूवर पायचीत पकडली गेली. तर स्मृती मंधाना 49 चेंडूत 43* धावा करून खेळपट्टीवर कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेली स्नेह राणा (4*) आणि स्मृती दुसऱ्या दिवशी भारतासाठी डावाची सुरुवात करतील.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी या सामन्याच्या पहिल्या डावात सलामीवीर बेथ मुनी (40), ताहलिया मॅकग्राथ (50) आणि कर्णधार एलिसा हिली यांनी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. सलामीवीर फिबी लिचफिल्ड गोल्डन डकवर बाद झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी एलिस पेरी 2 चेंडूत 4 धावा करून बाद झाली. तळातील फलंदाजांपैकी किम गर्थ हिने 28* धावांची खेळी केली. पण त्याव्यतिरिक्त एकही खेळाडू 20 धावांपेक्षा मोठे योगदान या डावात संघासाठी देऊ शकली नाही.
बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला स्वस्तात गुंडाळण्यासाठी पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पूजाने 16 षटकांमध्ये 53 धावां करून 4 विकेट्स घेतल्या. स्नेह राहाणाने 22.4 षटके टाकल्यानंतर 56 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा हिनेही 19 षटकांमध्ये 45 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. (Australia lead by 121 runs on the first day of the Mumbai Test)
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
भारत महिला: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड़।
ऑस्ट्रेलिया महिला: बेथ मूनी, फिबी लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्राथ, एलिसा हीली (विकेटकीपर/कप्तान), एनाबेल सदरलैंड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल।
महत्वाच्या बातम्या –
साक्षी मलिकविषयी धक्कादायक ब्रेकिंग! थेट शूज टेबलवर ठेवत झाली कुस्तीमधून निवृत्त, बृजभूषण सिंग…
‘प्लीज RCB जॉईन करा आणि एक ट्रॉफी जिंकून द्या…’, चाहत्याच्या प्रश्नावर Dhoni म्हणाला, ‘माझ्याच संघात…’