भारतीय कुस्ती महासंघ आणि बृजभूषण शरण सिंग मागच्या काही महिन्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले. गुरुवारी (21 डिसेंबर) अखेर कुस्ती महासंघाच्या निवडणुका पार पडला. माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना या निवडणुकीत सहभाग घेता आला नाही. पण त्यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांनी कुस्ती महासंघावर एकहाती सत्ता मिळवल्याचे दिसते. संजय सिंग यांना कुस्ती महासंघाचा नवीन अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहे.
यावर्षी सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बृजभूषण सिंग (Brijbhushan Sharan Singh) आणि भारतीय महिला कृस्तीपटू यांच्यातील वात चांगलाच तापला होता. तत्कालीन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI President) बृजभूषण यांच्यावर लौंगिक शषणाचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर हा वात दीर्घकाळ चालला. अखेर बृजभूषण यांना कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील कुणालाच कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाकडून दिला गेला.
याच कारणास्तव गुरुवारी पार पडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंग स्वतः उभे नव्हते. त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्यही या निवडणुकीत सहभागी नव्हता. पण निकटवर्तीय संजय सिंग यांना बृजभूषण यांनी ताकत दिल्याचे बोलले जात आहे. एकूण 47 पैकी 40 मते संजय सिंग यांना मिळाली. तर 7 मते त्यांच्या विरोधातील अनिता श्योरान यांना मिळाले. अनिता यांनी भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत. तसेच बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे त्यांना समर्थन देखील होते.
दरम्यान, गुरुवारी वार वडलेली निवडणुक केवळ कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपादासाठी नव्हती. यात चार वरिष्ट उपाध्यक्ष, चार उपाध्यक्ष, एक जनरल सेक्रेटरी, एक कोषाध्यक्ष आणि दोन संयुक्त सचिवांचीही मतदान पार पडले. (Sanjay Singh, a close associate of Brijbhushan Singh, became the new president of the Indian Wrestling Federation)
महत्वाच्या बातम्या –
‘प्लीज RCB जॉईन करा आणि एक ट्रॉफी जिंकून द्या…’, चाहत्याच्या प्रश्नावर Dhoni म्हणाला, ‘माझ्याच संघात…’
झिम्बाब्वे क्रिकेटने दोन प्रमुख खेळाडूंना केले निलंबित, मोठे कारण आले समोर