सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यामध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चमकदार कामगिरी करत आहे. बुमराहने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) बुमराहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये यादरम्यान 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यापूर्वीच अनेक माजी दिग्गज खेळाडू दोन्ही संघाबद्दल भविष्यवाणी करत आहेत, तर दोन्ही संघांचे खेळाडू देखील बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीची (Border Gavaskar Trophy) आतुरतेने वाट वाट पाहत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी याबाबत वक्तव्य देखील केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “बुमराह एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, मग तो सामना नवीन चेंडूने असो, थोडा जुना चेंडू असो किंवा जुन्या चेंडूने असो. बुमराहकडे सर्व प्रकारची उत्तम कौशल्ये आहेत, तो एक उत्तम गोलंदाज आहे. तौ तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे.”
बुमराहच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 37 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 70 टी20 सामने खेळले आहेत. 37 कसोटी सामन्यात त्याने 20.51च्या सरासरीने गोलंदाजी करत 164 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 44.5 राहिला आहे. 89 एकदिवसीय सामन्यात त्याने 23.55च्या सरासरीने गोलंदाजी करत 149 विकेट्स घेतल्या. बुमराहने 70 टी20 सामन्यात 89 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 4.59 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“फक्त 34 कसोटी खेळून महान…”, रिषभ पंतची धोनीशी तुलना करताना दिनेश कार्तिकचं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांची कसोटी कारकीर्द
तसाच रनअप, तशीच ॲक्शन; जगाला मिळाला दुसरा शोएब अख्तर! VIDEO