वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने आधी जाहीर केलेल्या आपल्या 15 सदस्यीय संघात एक बदल केला. जखमी अष्टपैलू ऍश्टन एगर याच्या जागी आता फलंदाज मार्नस लॅब्युशेन हा विश्वचषकात खेळताना दिसेल.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने या विश्वचषकासाठी सर्वात आधी आपल्या संघाची घोषणा केली होती. त्यावेळी संघात लॅब्युशेन याला स्थान मिळाले नव्हते. मात्र, आता फिरकी अष्टपैलू ऍश्टन एगर जखमी झाल्याने लॅब्युशेन याचा संघात समावेश केला गेला आहे.
JUST IN – The five-time @cricketworldcup champions have made a change to their 15-player squad ahead of #CWC23 👀
Details 👇https://t.co/DhwJwuN7BT
— ICC (@ICC) September 28, 2023
ऑस्ट्रेलियन संघाचा विचार केल्यास या संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स करेल. तर फलंदाजीत संघाची मदार अनुभवी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, लॅब्युशेन यांच्यावर असेल. मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन व मार्कस स्टॉयनिस हे संघाचे अष्टपैलू आहेत. तर ऍडम झम्पा एकमेव तज्ञ फिरकीपटू म्हणून भूमिका बजावेल. वेगवान गोलंदाजीची धुरा कर्णधार कमिन्ससह मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, सीन ऍबॉट हे वाहतील. तर जोश इंग्लिस व ऍलेक्स केरी हे संघाचे यष्टीरक्षक आहेत. सध्या दुखापतग्रस्त असलेला सलामीवीर ट्रेविस हेड हा सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये उपलब्ध नसेल. तरीदेखील तो संघात आपली जागा कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स केरी, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, मार्नस लॅब्युशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क.
(Australia Makes Change In World Cup Sqaud Agar Out Labuchagne In)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
Breaking: बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा