वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी आता उद्या सहा दिवसांचा अवधी शिल्लक राहिला. स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू असताना 6 या अंकाशी ज्याचा संबंध आहे तो म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा. भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वात हा विश्वचषक खेळेल. त्याच रोहितने विश्वचषकात आतापर्यंत सहा शतके झळकावली आहेत. ही सहा शतके कशी ठोकली गेली हे आपण पाहूया.
रोहितने आपला पहिला विश्वचषक 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये खेळला. या विश्वचषकातील साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये रोहित भारतीय संघाला चांगली सुरुवात देण्यात यशस्वी ठरत होता. मात्र, मोठी खेळी त्याच्या बॅटमधून येत नव्हती. त्यावेळी त्याने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशविरुद्ध शानदार शतक ठोकले. हे त्याच्या विश्वचषक कारकिर्दीतील पहिले शतक होते.
रोहितने इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 वनडे विश्वचषकात खऱ्या अर्थाने दमदार कामगिरी केली. आपल्या फलंदाजीने त्याने इंग्लंडमधील प्रत्येक मैदान गाजवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या बॅटमधून शतक आले. त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश या आशियाई संघाविरुद्ध देखील तिहेरी धावांचा आकडा गाठला. तर, अखेरच्या साखळी फेरीचा सामन्यातही त्याने इंग्लंडविरुद्ध शतक करण्याचा कारनामा केला.
त्याने विश्वचषकात आतापर्यंत 17 सामने खेळताना 65.20 च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतके व तीन अर्धशतकांचा समावेश दिसून येतो. आता भारतातच होत असलेल्या विश्वचषकात देखील भारतीय संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा असणार आहे. कर्णधार आणि सलामी फलंदाज अशी दुहेरी भूमिका खांद्यावर असताना तो कशी कामगिरी करतो, आणि भारताला पुन्हा विश्वविजेता बनवतो का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे
(World Cup Countdown Rohit Sharma Hits 6 Centuries In ODI World Cup)
विश्वचषक विशेष-
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला