श्रीलंकेवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहेत. यामुळे संपूर्ण देशाचीच परिस्थिती खराब झाली आहे. अशातच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नुकतेच त्यांचा देशाचा दौरा केला. या दौऱ्यावर मिळवलेली विजय रक्कम ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेतील आर्थिक तंगीने त्रस्त असलेल्या कुटुंबांना देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार पॅट कमिन्स, ऍरॉन फिंच आणि संघाने ऑस्ट्रेलिया युनिसेफच्या अंतर्गत ही आर्थिक मदत केली आहे. नेहमी स्लेजिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले असून त्याचे मोठ्या प्रणामात कौतुक होत आहे.
ऑस्ट्रेलियाने यावर्षीच्या जून-जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी श्रीलंकेची स्थिती जवळून पाहिली आहे. पेट्रोलच्या ठिकाणी लांबच लांब रांगा, गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या आसपास हजारो लोकांची शांतिपूर्वक आंदोलन अशा काही घटना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिसल्या आहेत. या आंदोलनांमुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधांनांना राजीनामा द्यावा लागला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने युनिसेफच्या अंतर्गत श्रीलंकेच्या संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपातकालीन विभागाला ४५००० डॉलर दान केले आहेत.
श्रीलंकेची आर्थिक व्यवस्था पार कोलमडून गेल्याने तेथील खाद्यपदार्थाच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. यामुळे सामन्य नागरिकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. शाळाही तीन दिवसांच्या करण्यात आल्या आहेत, जेणेकरून पेट्रोलची बचत होईल. पिण्याचे स्वच्छ पाणीही कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच मेडिकलच्या समोरील रांगाही औषधांच्या मोठ्या किमंतीमुळे कमी झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या खेळांडूकडून मिळालेली रक्कम यूनिसेफच्या कार्यक्रमांकडे जाईल, ज्याकडून श्रीलंकेतील १.७ मिलियन लहान मुलांच्या पोषण, स्वास्थ सुरक्षा, स्वच्छ पाणी आणि मानसिक आरोग्य या सुविधांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
Our Aussie men have donated their prize money from the recent tour of Sri Lanka to support children and families impacted by the nation's worst economic crisis in decades 💛 pic.twitter.com/XO3LaSGu7D
— Cricket Australia (@CricketAus) August 11, 2022
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने टी२० मालिका २-१ अशी जिंकली होती. तर श्रीलंकेने वनडे मालिका ३-२ अशी जिंकली. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची वार्न-मुरलीधरन ट्रॉफी झाली, जी १-१ अशी बरोबरीत राहिली.
🚨 Media release: UNICEF Australia extends thank you to the Australian men's cricket team, led by @patcummins30 & @AaronFinch5 after prize money ($45,000) from recent tour is donated to UNICEF's Sri Lanka appeal. @UNICEF_SriLanka
Learn more & donate: https://t.co/dGrJnzFnSG pic.twitter.com/VOKTTcPWoY
— UNICEF Australia (@unicefaustralia) August 11, 2022
श्रीलंकेतील याच परिस्थितीमुळे त्यांच्या देशातील एशिया कप स्पर्धा रद्द करण्यात आली. आता ती स्पर्धा दुबईमध्ये खेळली जाणार आहे, तर यजमानपद श्रीलंकेकडेच आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत, आशिया चषकापूर्वी होईल का बरा? कर्णधार म्हणतोय..
वाद चिघळला! पंतच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाचे प्रत्युत्तर; म्हणाली, ‘छोटू भैया, मी बदनाम व्हायला..’
बुमराहची दुखापत वाढवतेय भारतीय संघाची चिंता, टी२० विश्वचषकाबाबत गंभीर माहिती पुढे!