ऑस्ट्रेलियचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क हा जगातील अशा गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याला इंडियन प्रीमियर लीगमधील कोणताही संघ त्याला आपल्या गटात समाविष्ट कराण्यासाठी इच्छुक असेल. त्याची गोलंदाजी करण्याची गती आणि विकेट घेण्याची क्षमता कोणत्याही संघासाठी महत्त्वाची ठरु शकते. मात्र मागील काही दिवसांत दुखापतीमुळे व इतर काही गोष्टींमुळे जगातील नामांकित अशा आयपीएल या टी२० लीगमध्ये त्याने सहभाग घेतलेला नाही. येत्या १४ व्या आयपीएल हंगामात देखील त्याने न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यावर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जगभरातील खेळाडूंना या महत्त्वपूर्ण लीगचा भाग व्हायचे आहे, जेणेकरून ते आपल्या खेळात सुधार करू शकतील. परंतु, मिशेल स्टार्कने आयपीएलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना डावखुरा वेगवान गोलंदाजाने यंदाच्या आयपीएलच्या लिलावात भाग न घेण्याच्या आपल्या निर्णयामागील कारण सांगितले आहे.
शेफील्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्सकडून खेळणाऱ्या मिशेल स्टार्कने आयपीएलमध्ये भाग घेण्यापेक्षा शिल्ड क्रिकेटचा भाग होणे जास्त महत्त्वाचे आहे, असे सांगून आयपीएलच्या लिलावात भाग न घेण्याचे कारण स्पष्ट केले.
तो म्हणाला, “मला अधिकाधिक शिल्ड क्रिकेट खेळायचे आहे. माझ्या शरीरावर झालेल्या दुखापती लक्षात घेऊन मला शक्य तितके प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे आहे. माझे बरेच सहकारी खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याची तयारी करत असून तेथे खेळत आहेत, पण माझी इच्छा आहे की शिल्ड संघात सातत्यपूर्ण कामगिरी करून मी राष्ट्रीय संघात चांगली कामगिरी करू शकतो. बर्याच जणांसाठी, हा उन्हाळा खूप निराशाजनक आहे, परंतु ऑगस्टमध्ये बायोबबल सुरू झाल्यापासून प्रत्येकजण आतापर्यंत आपल्या परीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे.”
यापूर्वी मिशेल स्टार्कने आरसीबीकडून आयपीएलचे फक्त दोन हंगाम खेळले आहेत, ज्यात त्याने 27 सामन्यांत 27 बळी घेतले आहेत. 2018 मध्ये केकेआरच्या टीमने त्याला 9.4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु, दुखापतीमुळे त्याने आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर पुन्हा तो लिलावात सहभागी झाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसन यांचे हिंदी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क ; व्हिडिओ पहा..
INDvENG: पहिल्या वनडेत खेळल्या २ सख्ख्या भावांच्या जोड्या; सात वर्षांनी घडला ‘हा’ योगायोग