सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने 280 धावांनी बांगलादेशचा धुव्वा उडवला. आता दुसरा सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जात आहे. तत्पूर्वी नोव्हेंबरमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळली जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केलै आहे.
भारतीय संघाचे स्टार अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलिया संघ कसे सामोरे जाईल त्यावर आगामी ‘बॉर्डर-गावसकर ट्राॅफी’मधील (Border Gavaskar Trophy) यश अवलंबून आहे, असे स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे मत आहे. अश्विन आणि जडेजा हे कसोटीतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत हे सत्य ऑस्ट्रेलियाने मान्य केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला की, “आम्ही या दोघांविरुद्ध (अश्विन आणि जडेजा) उत्कृष्ट खेळलो तर आम्ही चांगल्या स्थितीत असू. हे दोन खेळाडू माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक वेळ गोलंदाजी करत आहेत. त्यांच्या गोलंदाजीची सामना करणे कठीण आहे. जसप्रीत बुमराहचा मुंबईत 2013 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम होता. मीही तिथे होतो आणि नेटमध्ये जवळजवळ दररोज त्याचा सामना केला. त्यावेळी तो एक युवा गोलंदाज होता. आता त्याला अशा प्रकारे प्रगती करताना आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज बनताना पाहून खूप आश्चर्य वाटते.”
महत्त्वाच्या बातम्या-
“गौतम गंभीरचा खरा चेहरा अजून समोर आलेला नाही”, बांगलादेशी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य
फक्त 264 धावा नाही, तर रोहितचा ‘हा’ रेकाॅर्ड मोडीत काढणे अशक्य!
कोण आहे तो फलंदाज…ज्यानं वयाच्या 25व्या वर्षी केली डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी! दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी