वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स असा सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडच्या गोलंदाजांची पिसे काढली. आधी डेव्हिड वॉर्नरने वेगवान शतक झळकावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने केवळ 40 चेंडूत शतक करत ऑस्ट्रेलियाला 399 पर्यंत पोहोचवले. मॅक्सवेलचे हे शतक वनडे विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले.
(Australia Post 399 Against Netherlands Warner And Maxwell Hits Centuries)