---Advertisement---

WTC चॅम्पियन बनूनही दक्षिण आफ्रिका नाही नंबर-1, अजूनही हाच संघ टाॅपला! पहा ताजी कसोटी क्रमवारी

On: रविवार, जून 15, 2025 11:41 PM
---Advertisement---

ICC Test Rankings: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025चा विजेता संघ दक्षिण आफ्रिका ठरला आहे. संघाने 27 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकली आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने धूळ चारत इतिहास रचला. आता लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा 2025-27चे नवीन चक्र (cycle) सुरू होणार आहे, त्याआधी आपण येथे टेस्ट फॉरमॅटमधील लेटेस्ट रँकिंगबद्दल जाणून घेऊयात. (ICC Test Rankings latest)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025चा उपविजेता ऑस्ट्रेलिया संघ सध्या टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे, ज्यांचे सध्या 123 गुण आहेत. डब्ल्यूटीसी 2025 चा चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे, ज्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर आले आहेत, त्यांचे आता 114 गुण झाले आहेत आणि इंग्लंड 113 रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत भारतीय संघ टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होता, परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग मालिका गमावल्यानंतर ते चौथ्या स्थानावर आहेत, ज्यांचे सध्या 105 गुण आहेत. (India Test cricket ranking) डब्ल्यूटीसी 2021चा विजेता न्यूझीलंड पाचव्या आणि श्रीलंका सध्या सहाव्या स्थानावर आहे. (Test cricket format rankings)

पाकिस्तान सातव्या, वेस्ट इंडीज आठव्या, बांगलादेश नवव्या आणि आयर्लंड दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27च्या चक्राची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने होणार आहे. भारतीय संघाला 2025 मध्ये इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायच्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---