जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील चौथा सामना रविवारी (23 जुलै) समाप्त झाला. मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यातील अखेरच्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. हा सामना अनिर्णित राहिल्याने ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेस आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. सध्या ऑस्ट्रेलियाकडे 2-1 अशी आघाडी आहे.
Australia retain the #Ashes 🏆
Rain prevents further play and the fourth Test is drawn! 👀
England still have a chance to level the series at The Oval 💪#WTC25 | #ENGvAUS | 📝 https://t.co/uygxFxx5BC pic.twitter.com/E37dRh2frB
— ICC (@ICC) July 23, 2023
मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर चौथ्या कसोटीतही ते तिसऱ्या दिवसाखेर आघाडीवर होते. फलंदाजीत धावांचा डोंगर उभारल्यानंतर आणि 275 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर त्यांनी तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला 4 बाद 118 असे रोखले होते.
इंग्लंड संघ विजयाच्या अगदी जवळ असताना चौथ्या दिवशी पावसाने खेळ केला. पहिल्या सत्राचा खेळ वाया गेल्यानंतर दुसऱ्या सत्रात मार्नस लॅब्युशेन व मिचेल मार्श यांनी शेतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत ठेवले. लॅब्युशेनने शानदार शतक पूर्ण केले. त्यानंतर टी ब्रेकनंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
पाचव्या दिवशी देखील इंग्लंडकडे विजयाची चांगली संधी होती. मात्र, निर्धारित वेळेच्या एक तास आधीपर्यंत पाऊस न थांबल्याने दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मागील ऍशेस जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडेच कुपी राहिल. आता मालिकेतील अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न इंग्लंड करेल.
(Australia Retain Ashes Manchester Test Draw Due To Heavy Rain)
आणखी वाचा:
त्रिनिदादमध्ये सिराजचा कहर! पाच बळींनी यजमानांना 255 वर गुंडाळले, भारताकडे 183 धावांची आघाडी
सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे