विश्वचषक विजेता (2023) ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातत्याने विजय नोंदवत होता. पण आता ह्या क्रमवारीला ब्रेक लागला आहे. ऑस्ट्रेलियाने मागील सलग 14 एकदिवसीय सामने जिंकले. मात्र आता इंग्लंडने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवत ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला आहे. इंग्लंडलाही सलग सात सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील संघाने पराभवाचा सिलसिला तोडला आणि या वनडे मालिकेत स्वतःला जिवंत ठेवले आहे.
या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषक 2023 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने कांगारू संघाचा पराभव केला होता. त्यानंतर संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 14 सामने जिंकले होते. यामध्ये 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे. सलग एकदिवसीय सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारण जानेवारी 2003 ते मे 2003 पर्यंत, संघाने सलग 21 एकदिवसीय सामने जिंकले होते. आता ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संघाने सलग 14 सामने जिंकले आहेत. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत श्रीलंकेने 13 सामने जिंकले.
HUNDRED FOR HARRY BROOK…!!!
– Maiden ODI hundred for Captain Harry Brook, what an incredible knock, hundred while chasing 305 runs against Starc & co. A knock to remember in his career. 🔥 pic.twitter.com/zaAdzcQQTs
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2024
या सामन्यात कर्णधार हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी शतक झळकावले. जे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. मात्र, पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि डकवर्थ लुईस पद्धतीच्या म्हणजेच डीएलएसच्या आधारे इंग्लंडने 46 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 304 धावा केल्या. ज्यात ॲलेक्स कॅरीच्या (77), स्टीव्ह स्मिथच्या (60) आणि ॲरॉन हार्डीच्या (44) धावांचा समावेश होता. इंग्लंडने 37.4 षटकात 4 गडी गमावून 254 धावा केल्या. ज्यात हॅरी ब्रूकच्या (110) आणि विल जॅकच्या (84) धावांचा समावेश होता. यानंतर पावसामुळे सामना पुढे होऊ शकला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल डीएलएसच्या नियमाद्वारे देण्यात आला. आशाप्रकारे पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडने स्वत:ला जिंवत ठेवले आहे. सध्या मालिका 2-1 अश्या स्थितीत आहे.
हेही वाचा-
आयपीएल 2025 पूर्वी केकेआरच्या ‘या’ खास सदस्याचा राजीनामा, तोडले 17 वर्षांचे नाते
कानपूर कसोटीतून बाहेर होऊ शकतात ‘हे’ 2 भारतीय क्रिकेटर, काय आहे कारण?
VIDEO: 0 W W 0 0 0 पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने घातला धुमाकूळ