---Advertisement---

IND vs AUS: स्मिथ-कॅरीचे अर्धशतक! कांगारूंचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान

---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. (India vs Australia Semifinal 1 Champions Trophy 2025)

या सामन्याचा टाॅस ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघ 264 धावांवरती सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार अर्धशतक झळकावले, तर कॅरीनेही 61 धावांची शानदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला 264 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 73 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये स्मिथची महत्त्वाची महत्त्वपूर्ण विकेट समाविष्ट होती.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि कपूर कॉनोली यांनी केली. कोनोलीला बॅटने चेंडूही खेळता आला नाही, त्याला मोहम्मद शमीने विकेटमागे झेलबाद केला. तो खाते उघडू शकला नाही. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. क्रीजवर स्थिरावल्यानंतर, ट्रॅव्हिस हेडने विस्फोटक फलंदाजी सुरू केली, परंतु वरुण चक्रवर्तीने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेडने 39 धावा केल्या.

सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर, कर्णधार स्टीव्ह स्मिथने जबाबदारी स्वीकारली आणि 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 96 चेंडूंच्या या खेळीत स्मिथने 4 चौकारांसह 1 षटकार लगावला. पण 37व्या षटकात शमीने स्मिथचा त्रिफळा उडवला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 198/5 अशी होती. यानंतर, विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला अक्षर पटेलने 7 धावांवर तंबूत पाठवले आणि ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला मोठा ब्रेक लावला.

आता ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात भारतीय संघ यशस्वी होतो का? हे पाहणेदेखील रंजक ठरेल. जो संघ या सामन्यात बाजी मारेल, तो संघ फायनल यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक मारेल. चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना (9 मार्च) रोजी खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

टॅव्हिस हेडच्या विकेटवर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO!
किंग कोहलीचा हटके अंदाज, ट्रेविस हेड बाद होताच केला मैदानावर भंगडा डान्स
IND vs AUS: विराटने रचला इतिहास! राहुल द्रविडचा विक्रम मोडून पहिल्या स्थानी झेप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---