गेल्या तीन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे दिवस फिरले आहेत. स्मिथ-वार्नर यांना झालेल्या शिक्षेनंतर ऑस्ट्रेनियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे.
आयसीसीने रविवार, दि. 17 जून रोजी जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या 34 वर्षात प्रथमच ऑस्ट्रेलियन संघ इतक्या निच्चांक स्थानी पोहचला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पीयन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तान संघाने मागे टाकत पाचवे स्थान पटकावले आहे.
सध्या टिम पेनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
स्मिथ-वार्नर याना शिक्षा झाल्यामुळे तर मिचेल स्टार्क, जॉस हेझलवूड आणि पॅट कमिंन्स दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा कना पार मोडून पडला आहे.
आयसीसीने रविवार दि. 17 जून रोजी जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड 124 रेटिंग्स सह अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघाने 122 रेटिंग्ससह दुसरे स्थान मिळवले आहे. 113 रेटिंग्ससह दक्षिन अफ्रिका तीसऱ्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात