बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) 2024-25 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये (22 नोव्हेंबर 2024) खेळली जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना (03 जानेवारी 2025) पासून खेळला जाईल. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सपासून (Pat Cummins) स्टार नाथन लायनपर्यंत (Nathan Lyon) अनेक खेळाडूंनी या मालिकेपूर्वी भारतीय संघाला इशारा दिला आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स खूपच उत्साहित आहे. तो म्हणाला की, “ही अशी ट्रॉफी आहे जी मी यापूर्वी जिंकलेली नाही. ही अशी ट्रॉफी आहे जी संघातील अनेक खेळाडूंनी जिंकलेली नाही.” त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नाथन लायनही भारताविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप उत्सुकता दाखवली आहे, तो म्हणाला की, “10 वर्षांपासूनचं स्वप्न आता पूर्ण करायचं आहे.”
ऑस्ट्रेलियानं शेवटची बाॅर्डर गावसकर ट्राॅफी 2014-15 मध्ये जिंकली होती. त्यानंतर भारतानं त्यांना एकही बाॅर्डर गावसकर ट्राॅफी जिंकू दिली नाही. 4 मालिका खेळल्या गेल्या. त्या 4 मालिकेतही भारतानं ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले आहे.
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वेळापत्रक-
पहिली कसोटी – 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी – 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी – 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी – 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी- 3 जानेवारी ते 7 जानेवारी, सिडनी
नाथन लायनच्या (Nathan Lyon) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं ऑस्ट्रेलियासाठी श्रीलंकेविरुद्ध 2011 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 129 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 30.28 सरासरी आणि 2.93च्या इकाॅनाॅमी रेटसह 530 विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात त्यानं सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या आहेत, तर एका डावात 8 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय
WTC टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी…पाकिस्तानची हालत खराब, जाणून घ्या सर्व 9 संघांची स्थिती
बाप तसा लेक! राहुल द्रविडच्या मुलाचा फलंदाजीत कहर; जोरदार षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल