जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना अवघ्या 24 तासांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन याने एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने ही स्पर्धा म्हणजे आपल्यासाठी विश्वचषक असल्याचे म्हटले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या या सायकलमध्ये अव्वलस्थान पटकावत अंतिम फेरीत जागा मिळवली. ऑस्ट्रेलियाच्या या यशात लायन याचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. या अंतिम सामन्याविषयी बोलताना तो म्हणाला,
“या अंतिम सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी हा सामना विश्वचषकाचा अंतिम सामना असल्यासारखा पाहतोय. खरे तर माझ्यासारख्या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूसाठी हा विश्वचषकच आहे. 2019 वनडे विश्वचषकात मी संघाचा भाग होतो. मात्र, त्यावेळी आम्हाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. यावेळी ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न असेल.”
लायन हा सध्या ऑस्ट्रेलियाचा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आहे. त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास त्याने 119 कसोटी सामने खेळताना 482 बळी टिपले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियासाठी त्यांनी सर्वाधिक 82 बळींची नोंद केलेली आहे. ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम फेरीतही त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
(Australia Spinner Nathan Lyon Said WTC Final Is World Cup For Me)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या ताकदीची द्रविडलाही जाणीव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी म्हणाला, ‘त्याला आऊट करणे…’
भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’