---Advertisement---

मोठी बातमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, ताफ्यात चार स्पिनर्स

AUS Team vs SA
---Advertisement---

भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांनंतर बहुप्रतिक्षीत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार सामन्यांंची ही कसोटी मालिका फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळली जाणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या दृष्टीकोनाने ही मालिका भारतासाठी अंत्यत महत्वाची आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचा 18 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियाने 22 वर्षाच्या टॉड मर्फी याला संघात निवडले आहे, ज्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे. संघामध्ये कॅमरुन ग्रीन आणि मिशेल स्टार्क यांनाही जागा दिली आहे, मात्र पहिल्या दोन सामन्यात हे दोघे खेळतील की नाही ते त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात मर्फी, नॅथन लियॉन, एश्टन एगर आणि मिचेल स्वीपसन असा फिरकीपटूंचा ताफा आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य संघनिवड अधिकारी जॉर्ज बेली म्हणाले, “मर्फीने शेफील्ड शील्डमध्ये चांगली कामगिरी केली असून त्याच्या बक्षिसाच्या रुपात त्याला संघात निवडले आहे.”

या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर, तिसरा सामना 1 ते 5 मार्चला धरमशाला आणि चौथा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

ही मालिका कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला महत्वाची आहे. या स्पर्धेची गुणतालिका पाहिली तर ऑस्ट्रेलिया 75.56 टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे आणि ते अंतिम फेरीत जवळपास पोहोचलेच आहेत. दुसरीकडे या गुणतालिकेत भारत 58.93 टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. ही मालिका भारताने जिंकली तर भारत अंतिम फेरीत पोहचणार.

या कसोटी मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेविड वॉर्नर, ऍश्टन एगर, स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, लान्स मॉरिस.

(Australia squad announced for Border-Gavaskar Trophy 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत श्रीलंकेला पाणी पाजणाऱ्या भारताने विश्वविक्रम केला नावे, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका
याला म्हणतात खिलाडूवृत्ती! रोहितच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली – पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---