---Advertisement---

पहिल्या वनडेत श्रीलंकेला पाणी पाजणाऱ्या भारताने विश्वविक्रम केला नावे, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका

On: मंगळवार, जानेवारी 10, 2023 10:54 PM
Team India Virat kohli hardik Pandya
---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. विजयानंतर भारतीय संघ या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे चौकार आणि षटकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कारकिर्दीतील 73 वे शतक केले, तर दुसरीकडे कुलस मेंडीसने देखील शतकीय खेळी केली. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या असून एका खास विक्रमात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला देखील मागे टाकले.

भारतीय संघाने मोडला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा विक्रम –
एकदिवसीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर ही 9 वी वेळ आहे, जेव्हा भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 350 पेक्षा मोठी धावसंख्या साकारली. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध 373 धावा साकारल्यानंतर भारताने विश्वविक्रम देखील नावावर केला. आता भारत वनडे क्रिकेटमध्ये एका ठराविक संघाविरुद्ध सर्वात जास्त वेळा 350 पेक्षा मोठी धावसंख्या करणारा संघ बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध खेळलेल्या एकूण 8 वनडे सामन्यांमध्ये 350 पेक्षा मोठी धावसंख्या केली होती. आता ऑस्ट्रेलिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

दरम्यान, या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण श्रीलंकन गोलंदाज भारतीय फलंदाजांच्या धावांवर लगाम लावू शकले नाहीत. रोहित शर्मा 83, तर शुबमन गिल 70 धावांची खेळी करू शकले . सलामीवीरांच्या या अप्रतिम प्रदर्शनामुळे भारताचे मध्यक्रमातील फलंदाज देखील मोकळेपणाने फलंदाजी करताना दिसले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहीलने 87 चेंडूत 113 धावांची सर्वात मोठी खेळी केली आणि संघाची धावसंख्या उचावली.

प्रत्युत्तरा श्रीलंकन संघासाठी त्यांचा सलामीवीर पाथुम निसांका याने 72, तर कर्णधार दासुन शनाका याने सहाव्या क्रमांकावर येऊन शतकीय खेळी केली. शनाकाने 88 चेंडूत 108 धावा केल्या. गोलंदाजी विभागात भारतासाठी उमरान मलिक (Umran Malik) सर्वाधिक 3 विकेस्ट घेऊ शकला, तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकन संघासाठी कसून रजिथा याने सर्वात जास्त तीन बळी घेतले. (IND vs SL 1st ODI The Indian team maked the world record and beat Australia.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जम्मू एक्स्प्रेस’ फुलस्पीडमध्ये! इतक्या वेगाने चेंडू टाकत उमरान बनला भारताचा सर्वकालीन वेगवान गोलंदाज
टेबल टॉपर विराट आणि वॉर्नरच्या शतकांमध्ये मोठी तफावत, रुट आणि स्मिथ राहिला खूपच मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---