ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 21 धावांनी पराभव स्वीकारला. मालिकेतील हा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियान जिंकत 1-2 अशा अंतराने मालिका नावावर केली असतील. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झंपा याने सर्वाधिक चार विकेट्स घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 2016 नंतर भारतीय संघाला भारतातील मालिकेत पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेवर संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी दोन वेळा केली आहे.
भारतीय संघाने 2016 नंतर मायदेशात खेळलेल्या सलग 18 मालिका जिंकल्या होत्या. पण त्यानंतर 2019 मध्ये ऑस्ट्रेलिायने भारताचा मायदेशातच पराभवर केला आणि विजयाचे हे सत्र थांबवले. 2016 नंतर भारताचा मायदेशातील हा पहिलाच पराभव होता. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मायदेशात पराभव स्वीकारल्यानंतर भारताने पुन्हा एकदा मायदेशात विजयाचे सत्र सुरू केले. 2019 नंतर मायदेशात खेळलेल्या मागच्या सलग 26 मालिका भारतानेच जिंकल्या. जगातिल एकही संघ भारतात भारताला पराभूत करण्यासाठी यादरम्यान पात्र ठरला नाही. अखेर यावर्षी ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपली गुवत्ता सिद्ध करत भारताला दणका दिला. अशात 2016 नंतर भारतात येऊन भारताविरुद्धची मालिका जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ ठरला आहे.
दरम्यान, उभय संघांतील यावर्षीची वनडे मालिका चांगलीच रोमांचक ठरली. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. पण सेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारत मालिका नावावर केली. नियमित कर्णधार पॅट कमिन्स अनुपस्थित असताना स्टीव स्मिथने कर्णधाराची भूमिका पुरेपूर निभावून नेली. स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 49 षटकांमध्ये 269 धावा करून ऑस्ट्रेलियने सर्व विकेट्स गमावल्या. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांच्या वाट्याला प्रत्येक दोन-दोन विकेट्स आल्या.
270 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात आल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे 30 आणि 37 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली (Virat Kohli) याने 54 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ सकला नाही. त्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या याने 40 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झंपा (Adam Zampa) व्यतिरिक्त ऍश्टन एगरने 2, तर शेन ऍबॉट आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
(Australia stopped India’s victory for the second time! After 26 consecutive series, Team India lost at home)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती- क्रिकेटर अतुल वासन
आठवणीतील सामना: भारतीय संघ १९ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत