नागपूर। भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या 3 सामन्यांची टी- 20 मालिकेत सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर 1- 1 अशी बरोबरी झाली आहे. मालिकेचा तिसरा सामना आज(10 नोव्हेंबर) नागपूर येथे खेळविण्यात येईल. या सामन्यात भारतीय संघाला एक खास विक्रम करत ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी आहे.
या सामन्यात जर भारताने धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला तर भारतीय संघाचा धावांचा पाठलाग करताना टी20मधील हा 42 वा विजय असेल. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल क्रमांकावर येईल.
सध्या या यादीत भारत आणि ऑस्ट्रेलिया 41 विजयांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाने 7 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवत या यादीत 41 विजयांसह अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे धावांचा पाठलाग करताना 40 विजय होते.
परंतू 8 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुद्ध टी20 सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला भारताच्या धावांचा पाठलाग करताना मिळवलेल्या 41 विजयांची बरोबरी केली.
पण आता भारताला ऑस्ट्रेलियाला मागे टाकत पून्हा एकदा या यादीत अव्वल क्रमांक मिळवण्याची संधी आहे.
आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा तिसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे पार पडेल.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –
41 विजय – भारत आणि ऑस्ट्रेलिया
36 विजय – पाकिस्तान
28 विजय – इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका
कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम करण्याची रोहित शर्माला आज सुवर्णसंधी
वाचा 👉 https://t.co/Y2NhzNLzZS 👈 #म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
या युवा गोलंदाजाने घेतल्या एका डावात १० विकेट्स, चाहत्यांना आठवला कुंबळे
वाचा- 👉https://t.co/d5RISD3oJ3👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019