ऑस्ट्रेलियानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आपला संघ जाहीर केला आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स या स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी चर्चा होती. परंतु त्याचं नाव संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. तो संघाचं नेतृत्व करतानाही दिसेल.
कमिन्स व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडही संघात परतला आहे, जो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. स्टीव्ह स्मिथ आणि मिशेल स्टार्क सारख्या अनुभवी खेळाडूंव्यतिरिक्त, मॅथ्यू शॉर्ट आणि आरोन हार्डी हे पहिल्यांदाच आयसीसीच्या या स्पर्धेत सहभागी होतील.
आपल्या दमदार गोलंदाजीनं होबार्ट हरिकेन्सला बीबीएल 14 च्या अंतिम फेरीत नेणाऱ्या नॅथन एलिसलाही संधी मिळाली. तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2023 विश्वचषक संघाचा भाग असलेला शॉन अॅबॉट यावेळी संघात स्थान मिळवू शकला नाही.
पॅट कमिन्सच्या घोट्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाही. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्टची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, बिग बॅश लीग आणि अलिकडच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर जेक फ्रेझर मॅकगर्कला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसह ग्रुप बी मध्ये स्थान देण्यात आलं आहे. कांगारू संघ 22 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळेल. त्यानंतर ते २५ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, अॅडम झंपा
हेही वाचा –
पंजाब किंग्जला मिळाला नवा कर्णधार, सलमान खान करणार घोषणा
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी माजी क्रिकेटपटूने निवडला भारतीय संघ, ‘या’ स्टार खेळाडूलाच वगळले
आयपीएल 2025च्या वेळापत्रकात बदल, कधी आणि कुठे होणार फायनल सामना?