पंजाब किंग्जला मिळाला नवा कर्णधार, सलमान खान करणार घोषणा

आगामी आयपीएल हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी आयपीएल 2025च्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) पंजाब किंग्जने (Punjab Kings) श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) 26.75 कोटी रूपयांना खरेदी केले होते. आता त्याला आयपीएल 2025 साठी मोठी जबाबदारी मिळणार आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि शशांक सिंग (Shashank Singh) हे टीव्ही शो बिग बॉस 18 मध्ये दिसले. येथे पंजाब किंग्जच्या नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले जाईल.
रविवारी रात्री बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) हे नाव जाहीर करेल. जर रिपोर्टवर विश्वास ठेवला तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पंजाबचा कर्णधार होऊ शकतो. युझवेंद्र चहल, श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग हे टीव्ही शोमध्ये दिसले. त्याचा प्रोमो देखील शनिवारी आला. आता पंजाब किंग्जचा कर्णधार जाहीर केला जाईल. पंजाबने रविवारी त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. बिग बॉस 18 मध्ये नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले जाईल अशी माहिती संघाने दिली.
शेवटच्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) भाग होता. केकेआरने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024च्या विजेतेपदावर नाव कोरले. केकेआरने फायनल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केला होता. यानंतर केकेआरने अय्यरला कायम ठेवले नाही.
टीव्ही शो बिग बॉस 18 मध्ये सलमान खानसोबत युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर दिसले होते. याचा एक प्रोमोही रिलीज झाला आहे. यामध्ये सलमान म्हणाला, “आता संपूर्ण भारताला पंजाब किंग्जचा कर्णधार कोण असेल हे जाणून घेण्याची वेळ आली आहे.”
श्रेयस अय्यरच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 115 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 32.24च्या सरासरीने फलंदाजी करताना 3,127 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 127.48 राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने 21 अर्धशतके देखील झळकावली आहेत, तर 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
🦁 x 🐯➡️ hoga ek bada khulasa,
dekhna mat bhoolna yeh naya kissa! 🫵#SaddaPunjab #PunjabKings #WeekendKaVaar #BiggBoss pic.twitter.com/Y5A5Px39L7— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025च्या वेळापत्रकात बदल, कधी आणि कुठे होणार फायनल सामना?
PD Champions Trophy; भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, मिळवला दणदणीत विजय
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, या खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी