---Advertisement---

आता कसं व्हायचं? खेळपट्टी पाहूनच ऑस्ट्रेलियन संघाला फुटला घाम, स्मिथ-वॉर्नरने…

On: मंगळवार, फेब्रुवारी 7, 2023 3:56 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हा सामना नागपूर (Nagpur Test) येथे खेळला जाणार आहे. ऍशेस इतकीच प्रतिष्ठेची मानली जाणारी ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy 2023) अत्यंत अटीतटीची होऊ शकते. मागील काही दिवसांपासून या मालिकेची सातत्याने चर्चा होतेय. त्याचवेळी आता नागपूर येथून अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ‌ याद्वारे स्पष्ट दिसत आहे की, ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्टीबाबत किती गंभीर आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला भारतात नेहमीच फिरकीपटूंंना सामोरे जावे लागते. भारतातील खेळपट्ट्या या प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांना मदत करतील अशा असतात. भारतीय संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव हे चार फिरकीपटू आहेत. त्यामुळे नागपूर येथे देखील अशीच खेळपट्टी मिळेल अशी शक्यता वर्तवली जातेय‌.

याच पार्श्वभूमीवर नागपूर येथे पोहोचलेला ऑस्ट्रेलिया संघ नुकताच सराव सत्रात सहभागी झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांच्यासह कर्णधार पॅट कमिन्स यांनी सुरुवातीला खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर संघाचे सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) व डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी देखील प्रत्यक्ष खेळपट्टी चाचपून पाहिली. ऑस्ट्रेलिया संघाला या मालिकेत यशस्वी व्हायचे असेल तर, स्मिथ व वॉर्नर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

नागपूर येथील पहिल्या सामन्यानंतर दुसरा सामना दिल्ली, तिसरा सामना धर्मशाला व अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. सध्या भारतीय क्रिकेट संघाकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. भारताने 2020-2021 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका आपल्या नावे केली होती. ऑस्ट्रेलियन संघ 2006 पासून भारतात कसोटी मालिका विजय मिळवू शकला नाही.

(Australia Team Smith Warner Cummins Inspection Nagpur Test Pitch)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---