---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया संघात वर्षभरातच रंगणार T20Iच्या दोन मालिका, जाणून घ्या सविस्तर

On: सोमवार, मे 30, 2022 7:18 PM
India-Australia
---Advertisement---

नुकतंच संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामाची सांगता झाली. त्यानंतर आता क्रिकेट रसिकांना मालिकांची आणि देश-विदेश दौऱ्यांची ओढ लागली आहे. अशातचं सोमवार ३० मे रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारताचा दौरा करणार आहेत. शिवाय सोमवारी झालेल्या घोषणेनुसार सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ भारताचा दौरा करणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबरमध्ये भारतात ३ टी२० सामने खेळण्यासाठी येणार आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक होणार आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष संघ यावर्षी भारत दौऱ्यावर ४ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे टी२० विश्वचषक एक वर्षाने पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय पुरुष संघ ९ ते १९ जून दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे, त्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार आहे.

भारतीय महिला संघ जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले की, “पुढील ८ महिने संघासाठी खूप रोमांचक असतील, ज्यात भारत दौरा, पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील सीरिज, द हंड्रेड आणि त्याचा मायदेशी हंगाम यांचा समावेश आहे. यानंतर टी२० विश्वचषक होणार आहे.”

दरम्यान, पुढील दोन वर्षे टीम इंडियासाठी महत्त्वाची आहेत. यादरम्यान २ विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाशिवाय पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. २०१३पासून भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. याच कारणामुळे कोहलीवर टीका झाली होती. त्यामुळे आता संघाचे नेतृत्व करणायाची जबाबदारी रोहित शर्मावर असणार आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा-

‘मिशन आयपीएल’ फत्ते केल्यानंतर आता हार्दिकचे आहे ‘हे’ लक्ष्य, देशासाठी करायचंय मोठ्ठ काम

‘सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या, पण…’ अनेक विक्रम तोडूनही बटलर ‘या’ कारणाने निराश

IPL 2022मध्ये सगळ्यात जास्त धावा करूनही बटलर निराश, अंतिम सामन्यात फेकून दिले हेल्मेट, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---