जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ गुरूवारी (8 जून) सुरू झाला. लंडन येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक तसेच भारताविरुद्धचे नववे कसोटी शतक ठरले.
ऑस्ट्रेलियात सर्वात अनुभवी फलंदाज असलेला स्मिथ पहिल्या दिवशी 95 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी पहिल्या शतकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत त्याने आपले शतक पूर्ण केले. याबरोबर रस्त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपल्याच देशाचा मॅथ्यू हेडन व वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल यांना पछाडले. तसेच भारताविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने इंग्लंडच्या जो रूटची बरोबरी केली.
(Australia Vice Captain Steve Smith Hits Century In WTC Final Against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट