---Advertisement---

मॅथ्यू वेडने केलेलं कृत्य न पटणारं! व्हिडिओत कैद झाली घटना, काय सांगतो आयसीसीचा नियम?

On: सोमवार, ऑक्टोबर 10, 2022 4:31 PM
Matthew-Wade-And-Mark-Wood
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघ टी20 क्रिकेटमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यातील पहिला टी20 सामना पर्थच्या स्टेडिअमवर रविवारी (9 ऑक्टोबर) पार पडला. हा सामना इंग्लंडने 8 धावांनी जिंकला. या विजयासह जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार घडला. ऑस्ट्रेलियन खेळाडूने लाजीरवाणे कृत्य केले.

ऑस्ट्रेलियन खेळाडूची लाजीरवाणे कृत्य
पहिल्या टी20 सामन्यादरम्यानच वाद उभा ठाकला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने बाद होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इंग्लंड संघाचा गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) याला धक्का दिला. हे सर्व प्रकरण ऑस्ट्रेलिया संघाच्या 17व्या डावातील तिसऱ्या चेंडूवर घडले. वेडने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू योग्यरीत्या बॅटवर आला नाही आणि तो हवेत उडाला. अशात गोलंदाज वूडकडे हा झेल घेत वेडला बाद करण्याची सुवर्णसंधी होती.

वूड आपल्याकडे येत असल्याचे पाहून वेडने क्रीझच्या आत जाण्याच्या प्रयत्नात लाजीरवाणे कृत्य केले. यादरम्यान वेडने झेलबाद होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वूडला हाताने धक्का दिला. त्यामुळे वूडला झेल घेता आला नाही. इंग्लंड संघाने वेडविरुद्ध ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ (अडथळा निर्माण करणे) या नियमाची अपील केली नाही. अशात मैदानात उपस्थित पंचांनी हे प्रकरण तिसऱ्या पंचांकडे पाठवले नाही.

जर इंग्लंड संघाने अपील केली असती, तर वेड तिसऱ्या पंचांद्वारे बाद घोषित झाला असता. कारण, त्याने जाणूनबुझून वूडला धक्का दिला होता. मात्र, वेडलाही संधीचा फायदा घेता आला नाही. तो 15 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.

काय सांगतो आयसीसीचा ‘हा’ नियम?
वेडने ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’चा आयसीसीचा तिसरा नियम 37.3 मोडला. या नियमानुसार, जर कोणताही फलंदाज झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकामध्ये अडथळा निर्माण करत असेल, तर त्याला बाद घोषित केले जाऊ शकते.

कर्णधार जोस बटलर काय म्हणाला?
हा घडला प्रकार कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने शांततेत घेतला. तो म्हणाला की, “मला माहिती नाही की, नेमकं काय झालं होतं. पंचांनी मला विचारलं की, मला अपील करायची आहे का?, तेव्हा मी विचार केला की, आम्हाला ऑस्ट्रेलियात अजून बराच काळ थांबायचंय. अशात इतक्या लवकर जोखीम घेऊ शकत नाही.”

दोन्ही देशांमध्ये आता दुसरा टी20 सामना 12 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना इंग्लंड, ना ऑस्ट्रेलिया; आयसीसीच्या मते भारत अन् पाकिस्तानचे ‘हे’ दोन खेळाडूच सर्वात भारी
हिला डाला ना! मैदान तर गाजवलंच, आता ‘माही भाईं’चा डोळा फिल्म इंडस्ट्रीवर; सुरू केलं प्रोडक्शन हाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---