---Advertisement---

दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवूनही इंग्लंडने केला असा लाजीरवाणा विक्रम

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 10:54 AM
---Advertisement---

मुंबई । गेल्या 11 वर्षांत इंग्लंडने वनडे सामन्यात फलंदाजी करताना पहिल्यांदाच तब्बल सात षटके निर्धाव खेळली आहेत. रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मॅनचेस्टर येथे झालेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात हा अनोखा विक्रम झाला. मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून एक एक निर्धाव षटक टाकले.  त्याच वेळी, पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन षटके निर्धाव  फेकली, तर जोश हेजलवूडने दोन षटके निर्धाव टाकली.

तरीही वनडे मालिकेच्या या दुसर्‍या सामन्यात यजमान इंग्लंडने 24 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 48.4 षटकांत 207 धावांवर गडगडला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून ओएन मॉर्गनने सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले, तर जेसन रॉय आणि जो रूटने अनुक्रमे 21, 39 धावांचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडला 231 धावांपर्यंत मजल मारता आली.

दुसरीकडे धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली नव्हती. वॉर्नर अवघ्या 6 धावांवर पॅवेलियनमध्ये परतला, परंतु दुसर्‍या टोकाला कर्णधार ऍरॉन फिंच डाव सावरत होता. पण त्याने 73 धावा करुनही संघ जिंकू शकला नाही.

यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात यजमानांचा पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 50 षटकांत 9 विकेट्सवर 294 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल यजमान इंग्लंडचा डाव 275 धावांवर आटोपला आणि संघाचा 19 धावांनी पराभव झाला.

इंग्लंडने टी -20 मालिका 2-1ने जिंकली

वनडे मालिकेपूर्वी तीन टी -20 सामन्यांची मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडली होती. ही मालिका इंग्लंडने 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत इंग्लंडने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी मिळविली होती. पण मालिकेतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत व्हाईटवॉश मिळण्यापासून वाचवला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---