मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात उद्या (18 जानेवारी) तिसरा आणि शेवटचा वनडे सामवा पार पडणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे हा सामना निर्णायक ठरणार आहे.
या सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघातील अनेक खेळाडूंना काही खास विक्रम करण्याचीही संधी आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे होऊ शकतात हे विक्रम –
– या सामन्यात जर शिखर धवनने 33 धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार करेल. त्याचबरोबर हा सामना त्याचा 116 वा वनडे सामना असणार आहे. त्यामुळे तो चौथ्या क्रमांकाचा सर्वात जलद 5000 हजार धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेटपटूही ठरण्याची संधी आहे. हा पराक्रम याआधी विराट आणि विवियन रिचर्ड्स यांनी 114 डावात, तर हाशिम अमलाने 101 डावात पूर्ण केला आहे.
– रविंद्र जडेजाने जर 10 धावा या सामन्यात केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करेल. तसेच यामुळे तो वनेडमध्ये 2000 धावा आणि 150 विकेट्स घेणारा जगातील 26 वा तर भारताचा तिसरा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरेल. भारताकडून असा पराक्रम याआधी कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनी केला आहे.
– मोहम्मद शमीला 250 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्यासाठी 1 विकेटची गरज आहे. त्याने कसोटीत 114 , वनडेत 97 आणि टी20मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.
– याबरोबरच शमीने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पाही गाठेल.
– कुलदीप यादवला 50 वनडे विकेट्सच्या टप्पा गाठण्यासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे.
– ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने जर या सामन्यात चार झेल घेतले तर तो 50 झेल पूर्ण करेल.
-रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी या सामन्यात 92 धावांची भागीदारी केली तर ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत 1000 धावा पूर्ण करतील. तसेच ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत 1000 धावांची भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी तर जगातील चौथी जोडी ठरु शकतात.
-वनडेमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला 4 विकेट्सची गरज आहे.
– अंबाती रायडूने या सामन्यात जर 53 धावा केल्या तर तो भारताबाहेर 1000 वनडे धावा पूर्ण करण्याचा पराक्रम करेल.
-एमएस धोनीला ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 34 धावांची गरज आहे. याआधी असा पराक्रम सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी केला आहे.
-रोहित शर्माला ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 19 धावांची गरज आहे. हा पराक्रम केला तर तो असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
-भारताने ही मालिका जिंकली तर भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.
– रोहितने या सामन्यात जर शतकी खेळी केली तर तो गांगुलीच्या 22 वनडे शतकांचा विक्रम मागे टाकेल. रोहितनेही आत्तापर्यंत 22 वनडे शतके केली आहेत. त्यामुळे तो वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत गांगुलीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 49 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल आणि 39 शतकांसह विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-या सामन्यात जर विराटने 67 धावा केल्या तर तो विंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मागे टाकू शकतो. लारा यांनी 299 वन-डे सामन्यात 10405 धावा केल्या आहेत. विराटने 218 वन-डे सामन्यात 10339 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–बऱ्याच काळानंतर सचिन तेंडुलकरने केले एमएस धोनीचे असे तोंडभरुन कौतुक!
–देशांतर्गत क्रिकेटचा बादशाह झाला सचिन, द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादित सामील
–मेलबर्न वनडे जिंकून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचण्याची संधी