भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी. गुकेश खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. सिंगापूर येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावला.
गुरुवारी (12 डिसेंबर) चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. ज्यात गतविजेता लिरेननं एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. यासह गुकेशनं वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन बनून नवा विक्रम रचला आहे. तो आता 18वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहे. या दरम्यान आता एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. जे की रशियन बुध्दिबळ महासंघाचे अध्यक्ष यांच्या संबधित आहे.
मीडिया रिपोट्नुसार, रशियाच्या बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आंद्रेई फिलाटोव्ह यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाला (FIDE) डी गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 14 व्या फेरीची चौकशी करण्यास सांगितले आहे. रशियन क्रीडा मंडळाच्या प्रमुखाचा असा विश्वास आहे की चिनी खेळाडू गुकेशविरुद्ध जाणूनबुजून हरला आहे. त्याची चुकीची चाल संशयास्पद असल्याचे म्हटले.
The President of the Chess Federation of Russia🇷🇺, FIDE honorary member Andrei Filatov, accuses Ding Liren🇨🇳 of losing on purpose, and asks @FIDE_chess to start an investigation:@FIDE_chess @tassagency_en https://t.co/mPpSjwj2xK pic.twitter.com/SANqHdhVEI
— Peter Heine Nielsen (@PHChess) December 12, 2024
View this post on Instagram
स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, काल (12 डिसेंबर) गुरुवार गुकेश आणि डिंग यांच्यात चॅम्पियनशिपची 14वी आणि शेवटची फेरी झाली. यापूर्वी झालेल्या 13 फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते. तर उर्वरित 9 सामने अनिर्णित राहिले होते. अशा स्थितीत दोघांचे समान 6.5 गुण होते. शेवटचा सामनाही अनिर्णित राहिला असता तर दोघांचे प्रत्येकी 7 गुण झाले असते आणि त्यानंतर टायब्रेकरनं निर्णय घेतला गेला असता. मात्र चेन्नईच्या या पठ्ठ्यानं असं होऊ दिलं नाही. गुकेशनं शेवटच्या फेरीत चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत 7.5 – 6.5 अशा फरकानं विजेतेपद पटकावले.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, गॅरी कर्स्टननंतर आता या प्रशिक्षकाचा राजीनामा
विश्वविजेत्या गुकेशला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? सर्वात तरुण विजेत्याची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का!
Special News : गुकेशनं वयाच्या 12व्या वर्षीच म्हटलं होतं – “तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनणार!”