भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. यापूर्वीच भारतीय संघाला नवीन जर्सी मिळाली आहे. सलामीवीर फलंदाज शिखर धवनने नवीन जर्सी घातलेला फोटो शेअर केला आहे.
धवनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून फोटो शेअर करत म्हटले की, “नवीन जर्सी, नवी प्रेरणा, आम्ही तयार आहोत.”
New jersey, renewed motivation. Ready to go. 🇮🇳 pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेसाठी ८० च्या दशकातून प्रेरित असलेली ‘रेट्रो’ थीम जर्सी घालणार आहे. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) आहे. तसेच या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्सचे नावही आहे. १९९२ च्या विश्वचषकातही भारतीय संघाने अशाप्रकारची जर्सी घातली होती.
विशेष म्हणजे नुकतेच बीसीसीआयने एमपीएलला नवे किट स्पॉन्सर्स म्हणून घोषित केले होते.
एमपीएलबरोबर बीसीसीआयने १२० कोटी रुपयांचा अधिक महसूल वाटा असा तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे आता नाईकीची जागा एमपीएल घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने ऑस्ट्रेलियाला चोपले, तीच जर्सी घालणार टीम इंडिया
टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू उतरणार विशेष जर्सीत, कारण आहे खूप खास
नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर