---Advertisement---

IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 4:00 PM
---Advertisement---

रविवारी(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. या सामन्यादरम्यान एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली. या सामन्यादरम्यान एका भारतीय युवकाने एका मुलीला सामना सुरु असतानाच लग्नाची मागणी घातली. याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ cricket.com.au च्या ट्विटवर शेअर करण्यात आला आहे. यात दिसते की एक युवक ज्याने भारतीय संघाची जर्सी परिधान केली आहे तो गुडघ्यावर बसून पिवळा टॉप घातलल्या मुलीला मागणी घालतो. हे पाहून ती मुलगी आश्चर्यचकीत होते. यानंतर ती त्याच्या मागणीला होकारही देते आणि त्याला मिठी मारते. हे पाहून ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलही हसत टाळ्या वाजवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मात्र हे प्रेमी युगुल नक्की कोण आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

भारत-इंग्लंड सामन्यादरम्यानही एका युवकाने प्रेयसीला घातली होती मागणी 

14 जुलै 2018 ला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना लॉर्ड्वर झाला होता. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीला थेट लग्नाची मागणी घातली होती. याचा व्हिडिओही सामन्यादरम्यान टेलिव्हिजन स्क्रिनवर दाखवण्यात आला होता. तसेच हा व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाला होता.

रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताला दिले 390 धावांचे आव्हान –

रविवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 390 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 104 धावांची शतकी खेळी केली. तर डेविड वॉर्नर(83), ऍरॉन फिंच (60), मार्नस लॅब्यूशेन(70) आणि ग्नेन मॅक्सवेल(63*) यांनी अर्धशतके केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडचा सलग दुसर्‍या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

भारतीय गोलंदाजांचं करायचं तरी काय? मागील पाच सामन्यात विरुद्ध संघाच्या सलामीवीरांनी केलीय ‘इतकी’ धुलाई

अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---