पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना पर्थमधील पर्थ स्टेडीयम या नवीन स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात बिनबाद 66 धावा केल्या आहेत.
या सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अचूक ठरवत आॅस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरॉन फिंच आणि मार्क्यूस हॅरिसने चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिलेले नाही.
त्यामुळे भारतीय गोलंदाजांना पहिल्या सत्रात एकही विकेट मिळलेली नाही. फिंच आणि मार्क्यूस यांनी पहिल्या सत्रापर्यंत नाबाद 66 धावांची सलामी भागीदारी रचली आहे.फिंच 81 चेंडूत 28 धावांवर आणि मार्क्यूस 76 चेंडूत 36 धावांवर नाबाद आहे.
या सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात रोहित शर्माच्या ऐवजी हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या ऐवजी उमेश यादवचा समावेश करण्यात आलेला आहे. रोहित आणि अश्विन दोघेही दुखापतीमुळे या कसोटी सामन्याला मुकले आहेत.
तसेच आॅस्ट्रेलियाने अॅडलेड ओव्हलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतील 11 जणांचा संघच दुसऱ्या कसोटीसाठीही कायम ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पर्थ कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–आयपीएलमध्ये हे ३ खेळाडू खेळणार किंग्ज ११ पंजाबकडून
–सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…