भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात, भारताने उत्तम कामगिरी करत सामना अनिर्णीत राखला. सामन्यात पूर्णतः ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असून देखील भारतीय संघाने झुंजार खेळ करत अनपेक्षितपणे सामना अनिर्णित अवस्थेत सोडवला. भारताच्या या कामगिरीत विशेष भूमिका बजावणाऱ्या रविचंद्र अश्विनने सामना संपल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत रिषभ पंतचे कौतुक करत त्याच्या खेळीमुळेच भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन झाल्याचे स्पष्ट केले.
सामन्यानंतर बोलताना अश्विन म्हणाला, “सिडनी मध्ये 400 धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते, कारण चेंडू असमतोलपणे वर-खाली राहत होता. पण त्याच्या ( पंत) इनिंग मुळे आम्हाला सेट होण्यास मदत मिळाली. पंत व पुजाराच्या विकेटमुळे तसेच विहारीच्या दुखापतीमुळे विजयाकडे जाणे थोडे अवघड झाले असते.”
अश्विनने आपल्यासोबत भागीदारी करणाऱ्या विहिरीचे देखील कौतुक केले. अश्विन म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा दौरा करणे हे फार कठीण काम असते. त्यामुळे विहारीला स्वतःवर गर्व असायला हवा. ही खेळी एखाद्या शतका प्रमाणे विशेष आहे .”
सामन्याच्या पाचव्या दिवशी विहारी व अश्विनने उत्तम भागीदारी करत सामना अनिर्णित राखण्यात मदत केली. अश्विनने आपल्या 39 धावांच्या खेळीत तब्बल 128 चेंडूंचा सामना केला. तसेच विहारीने देखील आपल्या 23 धावांच्या खेळीत 161 चेंडू खेळून काढले. दोघांच्या सहाव्या विकेटसाठी झालेल्या नाबाद भागीदारीने भारताला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले.
महत्वाच्या बातम्या:
रिकी पॉंटिंगची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला भारतीय संघ ब्रिस्बेनला न जाण्याची कारणे शोधत आहे
शर्यतीचा खेळ पडला महागात! पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारचा अपघात
आयसीसीच्या आगामी बैठकीत सौरव गांगुली नाही घेणार सहभाग, ही व्यक्ती करणार बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व