ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पार्थिव पटेल आणि रिषभ पंत हे दोघे यष्टीरक्षकासाठीचे पर्याय आहेत. दोघांपैकी कोण पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार याबाबत चर्चा सुरू आहे. यामध्येच भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीयर यांनी पटेललाच संधी द्यावी असे सुचविले आहे.
“पंत हा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी योग्य आहे. पण कसोटी सामन्यासाठी अनुभवी यष्टीरक्षकाला संधी द्यावी. म्हणून यासाठी पटेलच बरोबर आहे, तसेच त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभवही आहे”, असे इंजिनीयर एका कार्यक्रमामध्ये म्हणाले.
पटेल त्याचा शेवटचा सामना या वर्षाच्या सुरूवातील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे. तर पंतने यावर्षीच इंग्लंड विरुद्ध कसोटीत पदार्पण केले आहे.
“मी पंतला फलंदाजी करताना बघितले आहे. तो स्लिपमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतो. फलंदाजीत त्याला अजून खूप सराव करण्याची गरज आहे. वनडेसाठी पंत योग्य आहे पण कसोटी सामन्यासाठी पटेलच उत्कृष्ठ आहे. तसेच तो अजुनही फिट आहे”, असेही ते पुढे म्हणाले.
“आमच्यावेळी यष्टीरक्षक फलंदाजीपेक्षा यष्टीरक्षणावर अधिक भर देत होते. मात्र आताचे यष्टीरक्षक त्याच्या विरुद्ध करत आहेत. यष्टीरक्षण हे संघासाठी खुप महत्त्वाचे असते.”
“यष्टीरक्षकाने फलंदाजीत सर्वाधिक धावा केल्या पण झेल सोडले तर ते संघाला नुकसानदायक ठरू शकते. आताचे क्रिकेट फलंदाजी-यष्टीरक्षक असे आहे आमच्यावेळी यष्टीरक्षक-फलंदाजी असे होते ” असेही ते पुढे म्हणाला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–बंदी घातेलला स्टिव स्मिथ खेळणार चौथ्याच संघाकडून
–किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही स्थान मिळालेल्या युवराजला या संघाने दिला सहारा
–टी20 मालिकेआधी या कारणामुळे दु:खी होता शिखर धवन