---Advertisement---

….म्हणून चौथ्या कसोटीसाठीच्या भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा उद्याच होणार!

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 7:14 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. या मालिकेतील शेवटचा आणि चौथा सामना ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून (15 जानेवारी) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणती प्लेईंग इलेव्हन निवडणार यावर लक्ष लागले आहे. त्याचबरोबर या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, यावर भारतीय फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. मात्र भारतीय संघाने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केलेली नाही. कारण भारतीय संघातील बरेच खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला संघ निवडण्यासाठी अडचण येत आहे. भारतीय संघातील रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर अश्विन आणि बुमराह हे दुखापतीमुळे चौथा सामना खेळतील की नाही यावर शंका आहे.

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना म्हणाले, “आमची मेडिकल टीम बुमराह सोबत काम करत आहे. त्याचबरोबर तो चौथा कसोटी सामना खेळेल की नाही यावर उद्याच निर्णय घेतला जाईल. जर त्याला खेळता आले तर तो नक्कीच खेळेल. त्याच्या दुखापतीवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तो उद्या खेळेल की नाही यावर मला प्रतिक्रिया देता येणार नाही. आम्ही त्याला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आता यावर उद्याच काय ते कळेल, की तो प्लेईंग इलेव्हनमध्ये असेल की नसेल. ”

आतपर्यंत भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या खेळाडूंच्या दुखापतीवर लक्ष दिले जात आहे. जेणेकरून हे खेळाडू चौथा कसोटी सामना खेळू शकतील. तसेच चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक अगरवाल या खेळाडूंना सुद्धा संधी दिली जावू शकते.

महत्वाच्या बातम्या:

स्लेजिंग प्रकरणात कोच लँगर यांनी केली पेनची पाठराखण; म्हणाले, तो एक मेहनती खेळाडूच तर आहेच, पण

दोन दशकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा गाजतोय अझरुद्दीन; काय आहे नावामागील मनोरंजक रहस्य, वाचा

गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---