सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फराकाने आघाडीवर आहे.
या मालिकेत आत्तापर्यंत भारतीय संघाकडून 5 शतके झाली आहेत. यात 3 शतके ही चेतेश्वर पुजाराने तर विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी प्रत्येकी एक वेळा शतक केले आहे. पुजाराने अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी या अनुक्रमे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात शतके केली आहेत. तसेच विराटने पर्थमध्ये आणि पंतने सिडनीमध्ये शतक केले आहे.
मात्र ऑस्ट्रेलियाकडून या मालिकेत तब्बल 6 वेळा 100 पेक्षा अधिक धावा त्यांच्या चार गोलंदाजांनी दिल्या आहेत. यामध्ये तीन वेळा त्यांचा या मालिकेतील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज नॅथन लायनने 100 पेक्षा अधिक धावा गोलंदाजी करताना दिल्या आहेत.
त्याच्याबरोबरच मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स यांनी सिडनी कसोटीत प्रत्येकी एकवेळा 100 पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. नॅथनने अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी या अनुक्रमे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात गोलंदाजी करताना 100 पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत.
या मालिकेतील सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून मार्कस हॅरिसने अर्धशतक केले आहे. तर भारताकडून या डावात कुलदीप यादवने 3, रविंद्र जडेजाने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली आहे.
त्याचबरोबर भारताने आपला पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159 धावांची शतकी खेळी केली आहे. तसेच रविंद्र जडेजाने 81 आणि मयंक अगरवालने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…
–या संघसहकाऱ्यामुळे रिषभ पंतने केली दिडशतकी खेळी
–रिषभ पंतच्या त्या विक्रमाची चर्चा आजही देशात सुरुच