ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 26 डिसेंबरला मेलबर्न येथे होणार आहे.
या कसोटीसाठी भारतीय संघानी कसून सराव केला असला तरी संघाचे दुखापतीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पृथ्वी शॉच्या बाहेर जाण्याने मंयक अगरवालला संधी देण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळवल्यावर भारताला दुसऱ्या कसोटीमध्ये मोठा पराभव स्विकारावा लागला. या दुसऱ्या सामन्यात अंतिम अकरामधून रोहित शर्मा आणि आर अश्विन या दोघांना दुखापतीमुळे वगळण्यात आले होते. यामुळे हनुमा विहारी आणि उमेश यादव या दोघांना पर्थच्या सामन्यात खेळवण्यात आले होते.
रोहित तिसऱ्या सामन्यासाठी फिट असून अश्विनच्या फिटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
“अश्विनच्या फिटनेसबद्दल आम्हाला काळजी असून पुढील 48 तासानंतर कळेल की तो खेळण्यासाठी फिट आहे की नाही ते”, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले.
अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये अश्विनने 6 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला होता. तर पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये 146 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?
–मेलबर्न कसोटीआधी टीम इंडियासाठी ही आहे आनंदाची बातमी
–या ५ कारणांमुळे रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत येणार ओपनिंगला