पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा केल्या आहेत. तसेच ते 175 धावांनी आघाडीवर आहेत.
या सामन्यात भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने 43 धावांची आघाडी घेतली होती.
ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा डाव खेळण्यास मैदानात उतरल्यावर त्यांचा सलामीवीर एरॉन फिंच 13व्या षटकात दुखापतग्रस्त झाला. यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजाने मार्कस हॅरिस बरोबर चांगली फलंदाजी केली.
या सत्रात भारतीय गोलंदाजही उत्तम कामगिरी करत असल्याने कर्णधार विराट कोहली त्यांचे कौतुक करत होता. तसेच चाहतेही भारतीय गोलंदाजांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी स्लिपमध्ये थांबलेल्या कोहलीने भारतीय चाहत्यांना अजून मोठ्याने ओरडा असा इशारा त्यांच्याकडे वळून केला.
पर्थची ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उत्कृष्ट असून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 326 धावांवर रोखले होते. तसेच दुसऱ्या डावातही मोहम्मद शमीने दोन तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली असून अचूक गोलंदाजी केली आहे.
The crowd is up and about, but Virat wants more from the Indian fans!
How good is this Test match?! #AUSvIND pic.twitter.com/TIyDAVSmHx
— cricket.com.au (@cricketcomau) December 16, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–यष्टीरक्षक रिषभ पंतने फक्त २ सामन्यात घेतले तब्बल १५ झेल
–आॅस्ट्रेलियन भूमीत किंग कोहलीने केला सचिन तेंडुलकर एवढाच मोठा कारनामा
–विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर पेक्षा १३ डाव कमी खेळताना केला मोठा विश्वविक्रम
–पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी