टी२० विश्वचषक २०२१ अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. अंतिम सामना खेळायला रात्री ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी ७.०० वाजता सामन्यासाठी नाणेफेक केली जाईल. अंतिम सामन्यादरम्यान वातावरण चांगले राहणे खूपच महत्वाचे आहेे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेटियमवर रविवारी कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही, असे दिसत आहे.
कर्णधार केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघ टी२० विश्वचषकादरम्यान ग्रुप २ चा भाग होता. न्यूझीलंडने ५ लीग सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर मात करून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ ग्रुप १ चा भाग होता. ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या ५ लीग सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवला आणि एक सामना गमावला आहे. त्यानंतर उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेतून बाहेर केले होते. अंतिम सामन्यात हे दोन संघ एकमेकांसोबत भिडणार असून चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी खूपच उत्सुकता पाहायला मिळत आहे.
अंतिम सामन्यात चाहत्यांना दोन्ही संघात चांगला संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सामन्यापूर्वी हवामान व्यवस्थित असणे खूप गरजेचे असणार आहे. वेदर डॉट कॅमने दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबरला दुबई शहरात ३० डिग्री सेल्सियस येवढे तापमान असणार आहे, तर रात्री हेच तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
सामन्यादरम्यान पाऊस येणार नाही, असा अंदाज सांगितला गेला आहे आणि आकाशही स्वच्छ असेल. टक्केवारीमध्ये सांगायचे झाल्यास सामन्यादरम्यान पाऊस येण्याची केवळ २ टक्के शक्यता आहे. यादरम्यान आद्रतेचे प्रमाण ५४ टक्के असेल.
सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार. टी२० विश्वचषकादरम्यान याठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सरासरी १४१ धावा केल्या आहेत, तर दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी येणारा संघ सरासरी १२३ धावा करू शकला नाही. असे असले तरी स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना याच स्टेडियममध्ये खेळला गेला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष १९ व्या षटकात गाठले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडला ‘अंडरडॉग’ म्हटल्यावर आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
ट्राॅफीच्या डाव्या बाजूला उभं राहिलं की जिंकतंय? पाहा काय सांगतो आयसीसी विश्वचषकाचा इतिहास
सावधान! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरमूळे विराटचा सात वर्ष जुना विक्रम धोक्यात