काही दिवसातच भारतीय संघ येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे भारताविरुद्धच्या टी२० मालिकेवेळी ऑस्ट्रेलिया संघ खास डिजाईन असलेली जर्सी घालून मैदानावर उतरणार आहे. क्रिकेटजगतात स्वदेशी ऑस्ट्रेलियाई लोकांच्या भूमिकेला ओळख मिळवून देणे आणि त्यांना प्रोत्साहित करते, हा यामागचा उद्देश आहे.
दोन स्वदेशी महिलांनी केली मदत
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (११ नोव्हेंबर) खास डिजाईन असलेल्या जर्सीचे अनावरण केले आहे. ही जर्सी ASICS आणि दोन स्वदेशी महिलांच्या सहयोगाने बनवण्यात आली आहे. फियोना क्लार्क आणि कर्टन हाजेन ही त्या स्वदेशी महिलांची नावे आहेत. फियोना क्लार्क या दिग्गज क्रिकेटपटू मास्किटो यांच्या वंशज आहेत. मास्किटो हे १८६८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणारे ऑस्ट्रेलिया संघाचे पहिले स्वदेशी क्रिकेटपटू होते.
https://twitter.com/CricketAus/status/1326420887248252930?s=20
पुरुष संघापुर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघाने ही खास जर्सी घातली होती. जानेवारी-फेब्रुवारी २०२०मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात झालेल्या एका सामन्यादरम्यान त्यांनी ही जर्सी घातली होती.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने खास डिजाईन असलेली जर्सी घालण्यासंदर्भात आपले मत मांडले आहे. “पहिल्यांदा स्वदेशी जर्सी घालण्याची संधी मिळणार असल्यामुळे तो खूप उत्सुक आहे,” असे त्याने म्हटले आहे.
https://twitter.com/CricketAus/status/1326405724180803592?s=20
कधी होणार ऑस्ट्रेलिया-भारत टी२० मालिका
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर सुरुवातीला दोन्ही सघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे पहिला टी२० सामना खेळला जाईल. तर ६ डिसेंबर आणि ८ डिसेंबर रोजी सिडनी येथे अनुक्रमे दुसरा व तिसरा टी२० सामना होईल. त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
कोई शक ! विरेंद्र सेहवागने केले अनोख्या अंदाजात मुंबई इंडियन्सचे कौतुक
पिछा ना छोडेंगे! चेन्नईनंतर ‘हा’ मोठा किर्तीमान मिळवणारा मुंबई दुसराच संघ
मन जिंकलस भावा ! रोहितसाठी सूर्यकुमारने दिलेल्या बलिदानामुळे सोशल मीडियावर होतेयं जोरदार कौतुक
ट्रेंडिंग लेख-
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज