दक्षिण आफ्रिका येथे महिला टी20 विश्वचषक रविवारी (26 फेब्रुवारी) समाप्त झाला समाप्त झाला. केपटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत करत विश्वचषक उंचावला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग तिसरा व एकूण सहावा टी20 विश्वचषक आहे.
It’s a sixth Women’s #T20WorldCup title for Australia ✨
They successfully defended 156 to break South Africa’s hearts in Cape Town.#AUSvSA | #TurnItUp pic.twitter.com/3uCbCn2Hjl
— ICC (@ICC) February 26, 2023
न्यूलँड्स येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मूनी व हिली या ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी सलामी जोडीने संघाला 36 धावा उभारून दिल्या. हिली बाद झाल्यानंतर आलेल्या ऍश्ले गार्डनरने वादळी 29 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना बेथ मूनीने आपला शानदार फॉर्म कायम राखत 53 चेंडूवर नाबाद 74 धावांची खेळी केली. तिच्या याच खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघ 6 बाद156 अशी धावसंख्या उभारू शकला. दक्षिण आफ्रिकेसाठी इस्माईल व काप यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर लॉरा वॉल्वर्ट ही एकटीच संघर्ष करताना दिसली. तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेताना 48 चेंडूवर 61 धावा केल्या. तिला टायरनने 25 धावा करत साथ दिली. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकात केलेल्या कंजूस गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका संघ 19 धावा दूर राहिला. नाबाद अर्धशतक करणारी बेथ मूनी अंतिम सामन्याची मानकरी ठरली.
(Australia Womens Beat South Africa Womens In T20 World Cup Final By 19 Runs)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा