ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा अष्टपैलू जेस जॉनसन आणि सारा विअर्न अखेर लग्नबंधनात अडकल्या. जेन जॉनसनच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शुक्रवारी (14 एप्रिल) दोघिंच्या लग्नाचे फोटो शेअर केले गेले आहेत. या दोघी मागच्या मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये होत्या. 2018 मध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला होता.
माहितीनुसार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जेन जॉनसन आणि सारा विअर्न साखरपुड्यानंतर 2020 मध्ये लग्न करणार होत्या. मात्र, अचानक आलेल्या कोरोना महामारीमुळे गोष्टी पूर्णपणे पदल्या. जेस आणि साराला आपले लग्न देखील पुढे ठकलावे लागले. पण अखेर 6 एप्रिल रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. हवाईमध्ये दोघांचे लग्न झाले.
दोघींचे लग्नातील लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोत जेसने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ऑफ व्हाईट रंगाची पॅन्ट घातली आहे. तर साराने ऑफ व्हाईट शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातली आहे. हवाईच्या समुद्र किनारी दोघीही आनंदात दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहेल आहे की, “अखेर मी आणि माझई मैत्रिणीने लग्न केले. 6 एप्रिलला नेहमीच माझ्या मनात खास स्थान असेल.”
https://www.instagram.com/p/Cq_78PdBMEt/?utm_source=ig_web_copy_link
नुकत्याच भारतात पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये जेन जॉनसन दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होती. मेग लेनिंगच्या नेतृत्वात दिने दिल्लीसाठी महत्वाची भूमिका पार पाडली. लीगमध्ये खेळेल्या 9 सामन्यांमध्ये तिने 9 विकेट्स घेतल्या, सोबतच बॅटने 79 धावांचे योगादन देखील देऊ शकली. (Australia women’s cricket team all-rounder Jess Johnson and Sarah Wearn have finally tied the knot)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लसिथ मलिंगाचा सर्वात मोठा आयपीएल विक्रम उद्ध्वस्त! हंगामातील पहिल्याच सामन्यात रबाडाची मोठी कामगिरी
‘पर्पल कॅप होल्डर पुन्हा आलाय’, मोहितच्या कमबॅकने भारावले चाहते, ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर