---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणाऱ्या विश्वचषक फायनलबद्दल सर्वकाही…

On: रविवार, मार्च 8, 2020 7:00 AM
---Advertisement---

मेलबर्न। आज (८ मार्च) महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघात (Australia Women’s vs India Women’s) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरुवात होईल.

या विश्वचषकाची सुरुवात ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला संघातील सामन्याने झाली होती. त्याचबरोबर आता या विश्वचषकाचा अंतिम सामनादेखील या दोन संघात होणार आहे.

भारतीय महिला संघाचा हा टी२० विश्वचषकातील पहिलाच अंतिम सामना आहे. तर ऑस्ट्रेलिया महिला संघ टी२० विश्वचषकाचा सहावा अंतिम सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी खेळलेल्या ५ अंतिम सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवत विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यामुळे ते आज ५ वे विजेतेपद जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. तर भारतीय संघ पहिले टी२० विश्वविजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरेल.

या विश्वचषकात झालेल्या पहिला सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर 17 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांनी या विश्वचषकातील पुढील तीनही सामने जिंकत उपांत्य सामन्यात दिमाखात प्रवेश केला.

मात्र भारताला पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना खेळता आला नव्हता. त्यामुळे भारतीय संघाने अ गटात मिळवलेल्या अव्वल क्रमांकामुळे अंतिम सामन्यात प्रवेश केला.

तसेच ऑस्ट्रेलियाने या विश्वषकात साखळी फेरीतील ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर उपांत्य सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

आज होणाऱ्या भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील आयसीसी टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्याबद्दल सर्वकाही…

कधी होणार आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम सामना?

– भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना रविवारी (8 मार्च) होणार आहे.

कुठे होणार आहे आयसीसी टी20 विश्वचषकातील  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम सामना?

-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होणार आयसीसी टी20 विश्वचषकातील  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम सामना?

-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल.

कोणत्या चॅनेलवर पाहता येणार आयसीसी टी20 विश्वचषकातील  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम सामना?

-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

आयसीसी टी20 विश्वचषकातील  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?

-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना हॉटस्टार या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहे.

आयसीसी टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यासाठी यातून निवडले जातील 11 जणांचे संघ –

ऑस्ट्रेलिया संघ-

मेग लॅनिंग (कर्णधार), एलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, जेस जोनासन, ऍशले गार्डनर, रचेल हायनस, निकोला कॅरे, सोफी मोलिनेक्स, जॉर्जिया वेअरहॅम, डेलिसा किमिन्स, मेगन शट, मोली स्ट्रानो, एरिन बर्न्स, एनाबेल सुदरलँड,

भारतीय संघ – 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधना, शेफाली वर्मा, जेमीमाह रोड्रिगेज, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---