---Advertisement---

SL vs AUS: ऑस्ट्रेलियाची विजयी अखेर, मात्र मालिका नावावर करत श्रीलंकेने रचला इतिहास

On: शनिवार, जून 25, 2022 12:58 PM
Australia-Team
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा व अखेरचा वनडे सामना शुक्रवारी (२४ जून) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला. तरीही २-३ च्या फरकाने त्यांनी ही मालिका गमावली. दुसरीकडे श्रीलंका संघाने ही मालिका जिंकत ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर १९९२ नंतर प्रथमच वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. चमिका करुणारत्ने याला त्याच्या झंझावाती अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर कुशल मेंडिस याने मालिकावीर पुरस्कार पटकावला. 

या सामन्यात (Sri Lanka vs Australia) प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४३.१ षटकात १६० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३९.३ षटकातच ६ विकेट्स गमावत श्रीलंकेचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना नावावर केला.

श्रीलंकेच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची वरची फळी फेल ठरली. सलामीवीर ऍरॉन फिंच शून्य धावेवर बाद झाला. तर डेविड वॉर्नरनेही १० धावांवर विकेट गमावली. तसेच मिचेल मार्श (२४ धावा) आणि जोस इन्जलीस (५ धावा) यांना देखील जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र पुढे मधल्या फळीने संघाचा डाव सांभाळला.

यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीने ६५ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच मार्नस लाब्यूशेन (३१ धावा), कॅमरॉन ग्रीन (२५ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (१६ धावा) यांनीही उपयुक्त खेळी केल्या.

या डावात श्रीलंकेकडून जेफ्री वंडरसेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच महिश तिक्षीनाने २ आणि प्रमोद मदुशानने १ विकेटचे योगदान दिले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून एकट्या चमिका करुणारत्नेने चिवट झुंज दिली. त्याने ७५ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. यष्टीरक्षर कुसल मेंडिसने २६ धावांची छोटेखानी खेळी केली. तसेच प्रमोज मदुशान (१५ धावा) आणि चरिथ असलांका (१४ धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाजाला साध्या दुहेरी धावाही करता आल्या नाहीत. परिणामी केवळ १६० धावावर श्रीलंकेचा संघ गुंडाळला गेला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुड, पॅट कमिन्स आणि मॅथ्यू कुन्हेमान यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष

‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन

जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---