---Advertisement---

हेडच्या झंझावाताने ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश! मार्शच्या नेतृत्व कारकिर्दीची शानदार सुरुवात

On: रविवार, सप्टेंबर 3, 2023 11:40 PM
Australia
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सलग तुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. पाहुण्या संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 0-3 अशा अंतराने मात दिली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखून जिंकला. हा सामना रविवारी (3 सप्टेंबर) डरबनमध्ये खेळला गेला.

ड्रेविस हेड (Travis Head) सामनावीर ठरला, ज्याने ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करताना 91 धावांची वादळी खेळी केली. या धावा हेडने अवघ्या 48 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 191 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी17.5 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. ट्रेविस हेडनंतर जोश इग्लिस ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. यष्टीरक्षक जोशने 22 चेंडूत 190च्या स्ट्राईक रेटने 42 धावा कुटल्या.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 190 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पण त्यांच्या संघातील डोनोव्हन फरेरा (48), ऍडेन मार्करम (41) आणि सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (42) यांनी महत्वपूर्ण धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघासाठी शॉन ऍबॉट (Sean Abbott) याने 4 षटकात 31 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असून संघाला शानदार विजय मिळाला आहे. येत्या काळात देखील मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. (Australia won the T20I series against South Africa after winning the third T20I match by 5 wickets)

महत्वाच्या बातम्या – 
बांगलादेशपुढे अफगाणिस्तानने टाकल्या नांग्या, शाकिब सेनेचा निर्णायक विजय
BREAKING! आशिया चषक अर्ध्यात सोडून बुमराह मायदेशात, वेगवान गोलंदाज नाही खेळणार नेपाळविरुद्धचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---