---Advertisement---

शुभमंगल सावधान! ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर बेन कटिंगने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलशी बांधली लग्नगाठ

On: सोमवार, फेब्रुवारी 15, 2021 8:37 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघासाठी ४ एकदिवसीय सामने खेळलेला अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग लग्नबंधनात अडकला आहे. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

कटिंग गेल्या काही महिन्यापासून टिव्ही निवेदिका आणि मॉडेल एरिन हॉलेंडसोबत डेट करत होता. अखेर ते दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. २०१९ साली त्यांनी साखरपुडा केला होता आणि आता दोघांनी लग्नाची गाठ बांधली आहे.

एरिन आणि कटिंग हे दोघेही एकमेकांना गेल्या १० वर्षांपासून ओळखत आहेत आणि दोघांनाही क्रिकेटमध्ये रुची आहे. एरिन ही फक्त मॉडेलिंगसाठीच नव्हे तर गायन आणि नृत्यासाठी देखील ओळखली जाते. तसेच मॉडेलिंग विश्वात तिने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

https://www.instagram.com/p/CLRHi6Hl506/

बेन कटिंग हा आपल्या आक्रमक फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. २०१९ मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी लग्न करायचे देखील ठरवले होते. परंतु कटिंग दुबईमध्ये ग्लोबल लीग खेळण्यात व्यस्त होता तसेच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळेच त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती.

https://www.instagram.com/p/CLTkgHqFqNt/

बेन कटिंगची कामगिरी

बेन कटिंगने ऑस्ट्रेलियन संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडली आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघासाठी एकूण ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने २६. ५ च्या सरासरीने ५३ धावा केल्या आहेत. तसेच ७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १०च्या सरासरीने ४० धावा केल्या आहेत. त्याला ऑस्ट्रेलियन संघातून जास्त सामने खेळण्याची संधी नाही मिळाली. परंतु त्याने टी-२० लीग आपल्या फलंदाजीच्या जलवा दाखवला आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या २१ सामन्यात २१ च्या सरासरीने २३८ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

चांगली खेळी केल्यानंतरही विराट सापडला वादात,स्टीव्ह स्मिथशी केली तुलना

चेन्नईचा सुपर किंग! लाजवाब शतकाने माजी खेळाडूंनीही केला अश्विनला सलाम, ट्विटरवर वाहतोय प्रशंसेचा पूर

सिंग इज किंग ! सहा वर्षापासून युवराजचा आयपीएलमधील ‘हा’ विक्रम कोणीही मोडू शकला नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---