भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरम येथे पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठी धावसंख्या करूनही ऑस्ट्रेलियाला एक चेंडू शिल्लक असताना दोन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) याने दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही भारतीय फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे जावू शकत नाही. भारताचे सर्व खेळाडू चांगले आहेत. त्यांच्यापेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे राहणे कठीण आहे. कदाचित त्यांना त्रास देण्यासाठी आम्हाला आमची गोलंदाजी गती, लाईन आणि लेंथ बदलावी लागेल.”
पॉवरप्लेमध्ये तुमची भूमिका काय आहे असे जेसन बेहरेनडॉर्फला विचारले असता, वेगवान गोलंदाजाने उत्तर दिले की स्विंग शोधणे आणि भारतीय सलामीवीरांना त्रास देणे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणाला, “मी खूप भाग्यवान आहे की, जेव्हा मी भारतात खेळतो तेव्हा मला स्विंग लवकर मिळतो. त्यामुळेच मी गोलंदाजी चांगली करू शकलो आणि सुरुवातीपासूनच स्विंग करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पॉवरप्लेमध्ये मला विकेट्स घेता येतील. हेच मी आतापर्यंत करत आलो आहे.”
बेहरेनडॉर्फने भारतातील गोलंदाजीतून सर्वात मोठा धडा कोणता घेेतला आहे हेही सांगितले. तो म्हणाला, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच स्विंग मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि तीच माझी ताकद आहे, त्यामुळे मी त्यावर चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो. मी चेंडू सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण भारतात चेंडू पटकन स्विंग होतो. मी खेळपट्टीवर अवलंबून आहे. खेळपट्टीवर कोणतीही मदत नसल्यास, मी शक्य तितकी गोलंदाजीत विविधता वापरतो.” (Australian bowler’s big reveal Said More than Indian batsmen)
म्हत्वाच्या बातम्या
निवृत्ती घेतलेल्या इमाद वसीमला माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘तू निवृत्तीचा निर्णय…’
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ रिटेन, तर केकेआरने मुख्य अष्टपैलू खेळाडूला केले रिलीज