दक्षिण आफ्रिका येथे महिला टी20 विश्वचषक रविवारी (26 फेब्रुवारी) समाप्त झाला. केपटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत करत विश्वचषक उंचावला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग तिसरा व एकूण सहावा टी20 विश्वचषक आहे. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला पाचवा विश्वचषक जिंकून देण्याची कामगिरी केली.
Skipper Meg Lanning with one of her closest friends ????#AUSvSA #T20WorldCup #TurnItUp pic.twitter.com/jK3dijUHOg
— ICC (@ICC) February 26, 2023
केपटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बेथ मूनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 156 धावा धावफलकावर लावल्या. या धावा पार करताना दक्षिण आफ्रिकेतर्फे लॉरा वॉल्वर्ट हिने अर्धशतक झळकावत एकाकी झुंज दिली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाने दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा टी20 विश्वचषक आपल्या नावे केला.
ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार मेग लॅनिंग या विजयासह सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणारी कर्णधार देखील बनली. तिच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत पाच विश्वचषक जिंकले आहेत. 2014, 2018, 2020 व 2023 असे चार टी20 विश्वचषक आणि 2022 वनडे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची ती कर्णधार राहिली आहे. त्यासोबतच 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची देखील तीच कर्णधार होती. मात्र, ही स्पर्धा आयसीसीने आयोजित केली नव्हती.
पुरुष क्रिकेटचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार रिकी पॉंटिंग हा कर्णधार म्हणून चार आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरलेला. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2003 व 2007 वनडे विश्वचषक आपल्या नावे केलेला. तर, 2006 व 2009 चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी देखील तोच ऑस्ट्रेलियाचा कर्णधर होता. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात भारताला 2007 टी20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक व 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती.
(Australian Captain Meg Lanning Won Fifth ICC World Cup As Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आधी बीए पास कर आणि मग पीसीबी अध्यक्ष…’, माजी दिग्गजाचा शोएब अख्तरवर निशाणा
दिल्लीला दुहेरी धक्का! पंतच्या जागी यष्टीरक्षण करणारा खेळाडूही दुखापतग्रस्त, नुकताच गाजवलेला देशांतर्गत हंगाम