भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 असा दणदणीत विजय मिळवला. दरम्यान ऑस्ट्रेलियन कर्णधार ‘पॅट कमिन्स’ने (Pat Cummins) आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला नव्या उंचीवर नेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, संघाने भारताविरूद्ध केवळ वनडे विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल जिंकली नाही, तर 2014-15 नंतर प्रथमच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) जिंकली.
पॅट कमिन्सने बाॅर्डर-गावसकर मालिकेत 25 विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाला 3-1 असा संस्मरणीय विजय मिळवून दिला. यादरम्यान आता भारताचा पराभव करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा केल्यानंतर पॅट कमिन्सने विजयामागील रहस्यही उघड केले आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून बाॅर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली. शेवटच्या विजेत्या संघातून फक्त मिचेल स्टार्क (Mitchell Starc), नॅथन लायन (Nathan Lyon) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) संघात होते. या विजयानंतर पॅट कमिन्स म्हणाला, “ही एक ट्रॉफी होती जी आमच्या संघातील काही खेळाडूंकडे नव्हती. आम्ही ती जिंकली याचा आम्हाला अभिमान आहे.”
पुढे बोलताना कमिन्स म्हणाला की, “पर्थमधील पराभवानंतरही संघाने हार मानली नाही. आम्हाला माहित होते की आमची कामगिरी सरासरीपेक्षा कमी आहे, परंतु आम्ही संयम राखला आणि आमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले. आम्ही नेहमीच मजबूत संघावर विश्वास ठेवला आहे. नवीन खेळाडू सहजपणे संघात बसवले आणि त्यांची भूमिका निभावली. भारतासारख्या संघाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान आवश्यक आहे.”
या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलिया जूनमध्ये लॉर्ड्सवर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. कमिन्स म्हणाला, “हा एक अतिशय खास संघ आहे, जिथे प्रत्येकजण आपले सर्वोत्तम द्यायला तयार असतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.”
महत्त्वाच्या बातम्या-
RCBसाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूने झळकावले दमदार शतक
बाप तसा लेक! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा गोलंदाजीत जलवा
“कोचिंग स्टाफ काय करतोय?”, सिडनीतील पराभवानंतर दिग्गज खेळाडू भडकले